व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2024
in महाराष्ट्र
Niranjan Davkhare

Photo Courtesy : Team Dainik Maval


विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 1 जुलै) नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ;
1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- 28 हजार 585
3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
4) अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141

पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ( Niranjan Davkhare won in Konkan Graduate Constituency Jagannath Abhyankar won in Mumbai Teachers Constituency )

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी घोषित –
विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval
– भूतानच्या सीमेवर मावळचा सुपुत्र ! दहिवली गावचे भगवान मावकर यांची ‘नाईक’ पदी नियुक्ती । Karla News
– फौजदारी कायद्यांमधील बदलांबाबत कामशेत पोलिसांकडून जनजागृती, नेमके काय बदल झालेत? वाचा एका क्लिकवर । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Next Post

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tree plantation

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल - सोमनाथ घार्गे । Raigad News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.