महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. यातील पाच जागांसाठी भाजपाने सोमवारी (दि. 1 जुलै) उमेदवार जाहीर केले. त्यात पंकजा मुंडे, योगेश तिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आधी विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा अशा सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे विधानपरिषदेतून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांनाही संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ( Vidhan Parishad Election Pankaja Munde Yogesh Tilekar Parinay Phuke Amit Gorkhe Sadabhau Khot are BJP Candidates )
पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सतत केली जात होती. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता, तो वनवास लोकसभा निवडणूकीत संपेल असे वाटत होते, परंतू तिथेही त्यांचा पराभव झाला. परंतू आता अखेर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या विधानपरिषदेवर 5 जागा निवडून येऊ शकतात.
योगेश तिळेकर यांनाही संधी –
भाजपाने जाहीर केलेल्या 5 उमेदवारांमध्ये योगेश टिळेकर यांचाही समावेश आहे. पुण्याचे माजी आमदार आणि भाजपाचे ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या योगेश टिळेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी त्यांच्या गळ्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अधिक वाचा –
– मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी
– धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ; खासदार श्रीरंग बारणेंचे पत्र
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval