व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. यातील पाच जागांसाठी भाजपाने सोमवारी (दि. 1 जुलै) उमेदवार जाहीर केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2024
in महाराष्ट्र
Pankaja Munde Yogesh Tilekar

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. यातील पाच जागांसाठी भाजपाने सोमवारी (दि. 1 जुलै) उमेदवार जाहीर केले. त्यात पंकजा मुंडे, योगेश तिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आधी विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा अशा सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे विधानपरिषदेतून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांनाही संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ( Vidhan Parishad Election Pankaja Munde Yogesh Tilekar Parinay Phuke Amit Gorkhe Sadabhau Khot are BJP Candidates )

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सतत केली जात होती. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता, तो वनवास लोकसभा निवडणूकीत संपेल असे वाटत होते, परंतू तिथेही त्यांचा पराभव झाला. परंतू आता अखेर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या विधानपरिषदेवर 5 जागा निवडून येऊ शकतात.

योगेश तिळेकर यांनाही संधी –
भाजपाने जाहीर केलेल्या 5 उमेदवारांमध्ये योगेश टिळेकर यांचाही समावेश आहे. पुण्याचे माजी आमदार आणि भाजपाचे ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या योगेश टिळेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी त्यांच्या गळ्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अधिक वाचा –
– मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी
– धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ; खासदार श्रीरंग बारणेंचे पत्र
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval


Previous Post

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News

Next Post

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla-sunil-shelke

'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.