व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge

कार्ला - मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाले नाहीच.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
karla malavli bridge

Photo Courtesy : Team Dainik Maval


Karla Malavli Bridge : कार्ला – मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाले नाहीच. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी साकव पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतू आता प्रशासनाच्या या दिरंगाईने एका सामान्य नागरिकाचा जीव गेला आहे. मळवली येथील पर्यायी साकव पुलावरून एक आदिवासी व्यक्ती इंद्रायणी नदीत वाहून गेला असून काल, शुक्रवारपासून त्याचा शोध सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शुक्रवारी, दिनांक 5 जुलै सकाळी 6 च्या सुमारास भीमा पवार ही व्यक्ती इंद्रायणी नदीच्या पर्यायी साकव पुलावरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची दुर्घटना घडली. याबाबतची माहिती पोलिस पाटील संजय जाधव यांनी दिली. त्यानंतर शिवदुर्गची रेस्कू टीम आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि वाहून गेलेल्या भीमा पवार यांचा शोध सुरू केला. ( Karla Malavli Bridge One person died due to being washed away in Indrayani river )

इंद्रायणी पर्यायी पुलावरुन एक व्यक्ती पुलावरून वाहून गेल्याची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग पथक, मावळ वन्यजीव रक्षक पथक मावळ, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन तसेच स्थानिक नागरिक यांनी शोध मोहीम सुरू केली. नदीपात्रात जलपर्णी असल्याने शोध कार्यात काहीसा अडथळा येत आहे. शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत सदर व्यक्तीचा शोध लागला नाही, त्यामुळे आज (शनिवारी) पुन्हा शोधमोहिम सुरू होणार आहे.

कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवर सध्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. हा पुल पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले, प्रशासनाला निवेदने दिली. प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन वेळ मारून नेली. परंतु पूल काही झाला नाही, आणि ऐन पावसाळ्यात नागरिकांना पर्यायी अर्धा वाहून गेलेल्या साकव पुलावरून प्रवास करावा लागला. आणि यातच आता एका सामान्य निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे.

अधिक वाचा –
– राज्यात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या माहिती
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटींची तरतूद ; अर्ज प्रक्रियेत महिलांची अडवणूक खपवून घेणार नाही
– महत्वाचे ! झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर, गर्भवतींसाठी विशेष सूचना, वाचा सविस्तर


Previous Post

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway

Next Post

शाब्बास ! तळेगावचा ‘श्रीरूप जगताप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirup Jagtap Talegaon Dabhade

शाब्बास ! तळेगावचा 'श्रीरूप जगताप' शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.