मावळ तालुक्यात काँग्रेस पक्ष आता कूस बदलताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या नेतृत्वात संघटना बांधणी जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. गावोगावी युवकांची चर्चा बैठका करून त्यांना काँग्रेसमध्ये विविध पदावर संधी देण्याचे काम राजेश वाघोले करत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काही दिवसांपूर्वीच मावळ तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी संतोष वडेकर यांची निवड करण्यात आली. त्यावेळी आंदर मावळ काँग्रेसच्या महिला अध्यक्ष जयश्री मदगे, सोमनाथ भेगडे, राहुल वडेकर, निशांत रावते, उमेश कोकाटे, अजित गव्हाणे, यश कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी सावळा, कामशेत, माळेगाव आदी मावळ तालुक्यातील अनेक युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ( Maval Taluka Youth Congress office bearer appointment )
आंदर मावळ विभागातील पदाधिकारी नियुक्त्या –
युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी पप्पू मदगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सतीश ओव्हाळ यांची आंदर मावळ युवक कार्याध्यक्षपदी निवजड करण्यात आली. यावेळी आनंद मदगे, अजय मोरमारे, किरण कोकाटे, रामदास कोकाटे, उमाकांत मदगे, अक्षय मदगे आदी युवकांनी युवक काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, युवक तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रोहिदास वाळुंज, सहदू आर्डे, आंदर मावळ अध्यक्ष जयश्री मदगे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– महिलांसाठी मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्ग ; कुलस्वामिनी महिला मंचचा उपक्रम
– मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
– इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश