बुद्धी बरोबर इच्छाशक्तीला चालना देत देश समृद्ध करण्यासाठी व देशमजबुती साठी करियर करा आणि पैसा हा केंद्र स्थानी मानू नका तर कर्तृत्वाला स्थान द्या, असे मत पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक गुणगौरव समारंभा कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC तसेच कै. ॲड.शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कै. ॲड कु. शलाका संतोष खांडगे यांचे स्मरणार्थ मावळ तालुक्यातील माध्यमिक शालांत परिक्षा २०२४ मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थी गुणगौरव समारंभ व १०० टक्के निकाल लावलेल्या मुख्याध्यापकांचा सन्मान समारंभ तळेगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृहात संपन्न झाला. ( SSC students and their principals felicitated at Talegaon Dabhade )
यावेळी प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, दामोदर शिंदे,शिक्षक परिषेद ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, कार्यवाह महेश शेलार पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग,स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC चे अध्यक्ष मिलिंद शेलार, कै. ॲड कु . शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य खांडगे, कार्याध्यक्ष अभिलाश काळोखे, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बबन भसे, रोटरी जिल्हा ३१३१ चे मा.उपप्राल रो. शंकर हदिमणी , मा. अध्यक्ष रो. हिरामण बोत्रे, सुमती निलवे ,रो. अजय पाटील,खजिनदार रो. पांडुरंग पोटे, रो. संदीप मगर, परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माजी अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे, अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारीठे, कार्याध्यक्ष भारत काळे, कोषाध्यक्ष राजेंद्र भांड उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष खांडगे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थींनी तंत्रज्ञानाच्या जोरावर आपले ध्येया पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा विद्यार्थांनी मोठी स्वप्ने पाहा व आपल्या परिश्रम व अभ्यासाने ती पुर्ण करा. यावेळी मावळ तालुक्यातील ६० माध्यमिक शाळेतील दहावीमध्ये उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थी व ज्या शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला त्या शाळेचा व मुख्याध्यापकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिषदेचे उपाध्यक्ष श्रीनिवस गजेंद्रगडकर, सोपान असवले, धनकुमार शिंदे सहकार्यवाह रियाज तांबोळी, सहकोषाध्यक्ष राजकुमार वरघडे सल्लागार विलास भेगडे, धनंजय नांगरे,राम कदमबांडे, संजय वंजारे, राजेंद्र शेळके रोहन पंडित, वशिष्ठ गटकुळ,नामदेव गाभणे, गणेश ठोंबरे,समीर गाडे, मावळ तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मखर यांनी तर सुत्रसचलंन भारत काळे व वैशाली कोयते यांनी तर आभारप्रदर्शन रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मिलिंद शेलार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिक वाचा –
– एका दिवसात 155 शोधनिबंध प्रसिद्ध ! तळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा नवा विश्वविक्रम
– महिलांसाठी मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्ग ; कुलस्वामिनी महिला मंचचा उपक्रम
– मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…