व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापरे बाप ! कार्ला फाटा येथे तब्बल 48 किलो गांजा जप्त, तिघांना अटक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime News

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 12, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
ganja-seized-in-karla-phata

Photo Courtesy : Team Dainik Maval


गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संकल्प नशामुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. गुरूवारी, दिनांक 11 जुलै 2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत.

बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे दि. 11 जुलै रोजी पहाटे 03.05 वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने कार्तिक साहेब आणि पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली.

त्यात नमूद इसमांच्या सोबत असलेल्या चारचाकी वाहनाचे डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये रू 9,20,000/- (अक्षरी नऊ लाख वीस हजार रु.) किमतीचा 48 किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाईमध्ये 1)नितीन शिवाजी लेहने, वय 38 वर्ष, रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड, 2) संदिपान पाटलोबा गुट्टे, वय 39 वर्ष, राहणार परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड, 3) गणेश सुरेश दराडे, वय 30 वर्ष, राहणार केज, तालुका केज, जिल्हा बीड यांना त्यांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण पो.स्टे. येथे आणून सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. गु र.न. 223/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत. संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये 48 किलो गंजासह एकूण रु. 14,60,000 /- (अक्षरी – चौदा लाख साठ हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे, खासदार सुरेश म्हात्रे यांची मुख्य विश्वस्त म्हणून निवड
– लोणावळा शहराचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात अपघात ! भरधाव कारने 7 वर्षीय चिमुकल्याला उडवले । Talegaon Dabhade

Next Post

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
cow distribution of milch animals

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.