नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकीच्या संगणक विभागातील सानिया गपचुप या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ सायन्स या पदव्युत्तर शिक्षणासाठी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सानिया हिने इंटरनॅशनल इंग्लिश लॅंग्वेज टेस्टिंग सिस्टिम (आयईएलटीएस ) ही परीक्षा दहा पैकी सात गुण प्राप्त करून वार्षिक 5 लाख इतकी (6000 डॉलर ) शिष्यवृत्ती मिळवली आहे. ही परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये श्रवण, वाचन, लेखन, वक्तृत्व या चाचण्यांच्या आधारे घेतली जाते. नूतन महाविद्यालयाचा संगणक अभियांत्रिकी विभाग हा एनबीए मानांकन प्राप्त असून याचा उपयोग सानिया हिस शिष्यवृत्ती मिळवण्यास झाला आहे. ( Sania Gapchup chosen for postgraduate studies at New York University Honored by Bala Bhegade )
संस्थचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, संगणक विभाग प्रमुख डॉ. प्रसाद ढोरे, आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण समन्वयक प्रा. सत्यजित सिरसट, प्रा. सुषमा भोसले यांचे अभिनंदन केले आणि सानिया हिस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा
– सतर्क राहा ! लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासापासून बरसतोय मुसळधार पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
– ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News