दरवर्षी एकत्र येत घरगुती गणेशोत्सव साजरे करणारे आणि पर्यावरणपुरक सजावटीसाठी गौरविण्यात आलेले लोणावळ्यातील प्रसिद्ध वर्तक कुटुंबाने यंदा गणेशोत्सवाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 वृक्षांची लागवड आणि संवर्धन संकल्प सोडत गणेशोत्सवाची तयारी सुरू केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी श्रीफळ चढवून उत्साहात झाडे लागवडीला सुरूवात केली गेली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ ह्या संत तुकाराम महाराजांच्या संदेशाचे अनुकरण करत वर्तक कुटूंबातील महिला, पुरुष आणि लहान मुला-मुलींनी एकत्र येत ठोंबरेवाडी जवळ कुरवंडे मार्गावर लोणावळा डॅम येथे 75 वृक्षांची लागवड केली. वृक्षांची लागवड करून पुढील कालावधीत त्या वृक्षांचे पूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. ( Plantation of trees at Bhushi Dam by Vartak family Lonavala )
गेली कित्येक वर्षे पर्यावरण पूरक गणेशोत्सव सजावट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक कुटुंबाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, लोणावळा नगरपालिका आणि अनेक खाजगी पर्यावरण संवर्धन संस्थांकडून घरगुती पर्यावरण पूरक गणेश सजावटीसाठी गौरविण्यात आले. हीच परंपरा कायम राखत यंदा अमृतमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त वर्तक कुटुंबातील चारही पिढ्यांनी 75 वृक्षांची लागवड केली. तसेच पुन्हा एकदा पर्यावरण पूरक सजावटीचा संस्कार पुढच्या पिढीला आणि समाजाला सुपूर्त केला.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांवर निवडून आलेल्या आमदारांची यादी – वाचा एका क्लिकवर
– शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls