Lohgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामामुळे या गडाचे वैभव व पावित्र्य नष्ट होऊ लागले असून हे अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे, असे निवदेन बजरंग दलाच्या वतीने केंद्रीय पुरात्व विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार मावळ यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच सदर अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बजरंग दल मावळ आणि सखल हिंदू बांधवांच्या वतीने लोहगड अतिक्रमणमुक्त व्हावा म्हणून शनिवारी (दि. 13) रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ अशा घोषणांनी लोहगड पायथा दणाणून गेला होता. लोहगडावर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ( Bajrang Dal Maval demand to remove unauthorized construction at Lohgad Fort )
यावेळी बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संतोष भेगडे, सोलापूर विभाग मंत्री संदेश भेगडे, विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे, प्रश्नांत भेगडे,नवनाथ ठाकर, अंनता अगळमे, योगेश शटे, महेंद्र असवले, बजरंग दलाचे सह संयोजक प्रशांत ठाकर, स्वप्निल भालेकर, प्रतिक गोसावी, विशाल ढोले, विश्वास दळवी, दत्ता ठाकर यांच्या सह मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले लोहगड वरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मागील अनेक वर्ष बजरंग दल संघटने मार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात असून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती संघटनेला आजपर्यंत देण्यात आली नाही. सध्या राज्यात विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठीचा मुद्दा तापला आहे, त्याच पार्श्वभूमीवर लोहगडावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची मागणी तीव्र होत आहे. जर पुढील महिन्याभरात लोहगड अतिक्रमण विरहित पहायला मिळाला नाही तर 11 ऑगस्ट रोजी बजरंग दलाच्या व मावळातील जनतेच्या वतीने तीव्र व बेमुदत आंदोलन करणार आहे, असा इशारा यावेळी बोलताना बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’, पंढरपूरमध्ये असणार मुख्यालय
– देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडविणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना मिळणार लाभ