व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Pune News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आलेल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव, वॉर्ड स्तरावर बैठका घेवून नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सरपंच, नगरसेवकांना आवाहन करण्यात आलेले आहे. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 13 thousand applications in Maval taluka Pune )

गावातील अथवा त्या त्या वार्ड मधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जांची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी नोंदवहीत ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करून आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्यात बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे

गावातील प्राप्त झालेल्या सर्व ऑफलाईन अर्जाचे ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी बचत गट तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येवून ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेबबेस्ड एप्लीकेशन लिंक तसेच डॅशबोर्डचा अॅक्सेस लवकर प्राप्त झाल्यास कामात सुसूत्रता व अधिक गतिशिलपणे कामकाज होणार आहे. योजनेच्या प्रसिध्दीसाठी शासनस्तरावरून प्राप्त आदर्श जाहिरात नमुन्याप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायतमार्फत गावातील दर्शनी भागावर व शिबिरांच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज तर ऑनलाईन पद्धतीने ४५ हजार ४०१ असे एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही मिळून आंबेगांव तालुक्यात १६ हजार २७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती १७ हजार ५०९, भोर ४ हजार ३७६, दौंड ७ हजार १०८, इंदापूर १० हजार ८४, हवेली १० हजार ६६५, जुन्नर १२ हजार ८४३, खेड १० हजार ३४, मावळ १३ हजार १८३, मुळशी ५ हजार ४५६, पुरंदर ९ हजार ७१८, शिरुर १५ हजार ८४२ वेल्हा तालुक्यात १ हजार ४३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अनधिकृत शाळांवर कारवाई करावी ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे निवदेन । Maval News
– दिवंगत शिवसैनिक उमेश भाई शेट्टी आणि शंकर मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Lonavala News
– सोमाटणे येथील मुऱ्हे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई । Talegaon Dabhade Crime


Previous Post

महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान

Next Post

भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Charsutri Method Rice Cultivation

भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.