Dainik Maval News : पंचायत समिती मावळ च्या शिक्षण विभाग च्या वतीने 2023-24 वर्षातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेल्या तालुकास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक, केंद्रप्रमुख यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पंचायत समिती मावळ च्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी संताजी जाधव, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले यांंच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सुदाम वाळुंज गटशिक्षणाधिकारी पं. स. मावळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, पालक यांचे कौतुक केले. सोबतच शिक्षकांबरोबर पालकांनी सुद्धा पाल्याच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतूक करून चांगले यश संपादित केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या. जास्तीत जास्त विदयार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत, मावळ तालुक्यात 4 शाळा अनधिकृत, पाहा संपूर्ण यादी
याप्रसंगी शिष्यवृत्ती मार्गदर्शक सेवानिवृत शिक्षक श्रीकांत दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्योती लावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तालुक्यातील इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचे शिष्यवृत्तीधारक एकूण 38 विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक 25, पालक 26 यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन केंद्रप्रमुख सुहास धस, निर्मला काळे, सुहास विटे तसेच केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती व विशेष शिक्षक यांनी केले. विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा
– भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप