व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 19, 2024
in पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Sharad-Pawar

Photo Courtesy : X / Sharad Pawar


Dainik Maval News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, दिनांक 20 जुलै 2024 रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरीगाव या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमस्थळी भव्य असा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे. शिवाय 12 ते 15 हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दहापैकी तब्बल आठ खासदार संसदेत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात अशा भव्य कार्यक्रमासाठी येत आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असा विजयी संकल्प करण्यात येणार आहे.” – तुषार कामठे

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दुरदृष्टीय धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या सर्व कार्यकाळात शहरातील कित्येक पितृतुल्य ज्येष्ठ मान्यवरांची शरद पवार साहेबांना भक्कम साथ लाभली, अशा शरद पवार साहेबांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. दुर्दैवाने आज हयात नाहीत अशा ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या स्मृतिगंध स्वरूपी आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात येईल. त्याचबरोबर नवनिर्वाचित आठ खासदारांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली. ( Grand Victory Resolution Rally In Presence of Sharad Pawar At Pimpri Chinchwad City )

देशाला वाचविण्यासाठी तसेच संविधान रक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करून मोलाचे योगदान देणारे ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे या मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी एमआयएम पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांतजी वर्पे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, नव्यानेच पक्षात प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांच्यासह विनायक रणसुभे, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, विशाल भाई जाधव, राजरत्न शिलवंत, सचिन गायकवाड, पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना
– इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution
– लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates


Previous Post

मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर

Next Post

मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
drowning

मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.