‘संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जन्मदिनानिमित्त रविवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी आयोजित ‘ सोहळा पंडित नेहरूंच्या विचाराचा ‘ या प्रा. श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे झाले.
या व्याख्यानामधून पंडितजींचे विचारविश्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काही महत्त्वाच्या परिमाणांचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीरंजन आवटे यांनी केला. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे होते. व्यासपीठावर अरुणा तिवारी, प्रसाद झावरे, प्रशांत कोठडिया उपस्थित होते. महावीर जोंधळे, अंजली चिपलकट्टी, डॉ. प्रदीप आवटे, जांबुवंत मनोहर यांच्यासहीत अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते. ( Jawaharlal Nehru Jayanti 2022 Lecture In Pune City Organize By Constitutional Nationalism Forum )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 रोजी, सायंकाळी 6 वाजता याच विषयावरील पुढील व्याख्यान होणार आहे. या दुसऱ्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख आणि इतिहास तज्ञ डॉ. प्रा. श्रद्धा कुंभोजकर हे भुषवणार आहेत.
श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘पंतप्रधान,धोरणकर्ता, विश्वनेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला. स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत यांना जोडणारी भारत जोडो यात्राच जणू नेहरू यांनी काढली. नेहरूंना यांना समजावून घेणे म्हणजे भारताच्या, आपल्या मुळांचा शोध घेणे होय. नेहरू हेच गांधीजींचे राजकीय वारस आहेत, विनोबा भावे हे त्यांचे अध्यात्मिक वारस आहेत. ‘फॅसिझम आणि साम्राज्यवादाचे त्यांचे आकलन महत्वपूर्ण होते. नेहरूंनी वैश्विक भानातून नवराजकारण भारतात घडवलं. स्वातंत्र्य मिळविण्याआधीच विभूतीपूजेपासून सावध केले. पं. नेहरूंच्या प्रचंड योगदानानंतरही त्यांच्या पश्चात देशाने आणि काँग्रेसनेही पं. नेहरूंकडे दुर्लक्ष केले, हे दुर्देव आहे’.
‘नेहरू हे धर्मद्वेष्टे नव्हते पण, ते धर्मांधतेवर उत्तर शोधत होते. धर्मनिरपक्षतेची मूलभूत चौकट आपण स्विकारली आहे, याचे भान त्यांना सतत होते.टीका ऐकून घेण्याची त्यांची तयारी होती. दंगलींनी जवळपास बेचिराख झालेल्या देशाची सूत्र हातात घेताना आणि नंतर ब्रिटिशांच्या नावाने खडे फोडत न बसता नवी रचना त्यांनी उभी करून दाखवली. स्वतंत्र भारतात सर्वांना मताधिकार दिला, ही ऐतिहासिक गोष्ट आहे,’ असेही प्रा. आवटे म्हणाले.
प्रशांत कोठडिया म्हणाले, ‘नेहरूंना ,गांधींना टाळता येणार नाही. पं. नेहरूंना कधीही आपण विश्वगुरु असल्याची जाहिरात केली नाही, तरी त्यांना विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली, कारण त्यांनी मूलभूत योगदान दिले’.
अधिक वाचा –
– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध
– ‘राजकारणातला गद्दार…अब्दुल सत्तार’, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल