मावळ आणि मुळशी तालुक्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व धरणाची पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहेत. तसेच नद्या, ओढे यांच्या प्रवाहात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने धबधव्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. मावळ व मुळशी तालूक्यातील अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळे, धरणे व त्यासभोतालील परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आलेले आहेत. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहेत आदेश?
मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व गावांच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी (जबाबदारी युक्त पर्यटन) राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सुरेंद्र नवले (उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी) यांनी पुणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी.,
दिनांक 25 जुलै 2024 सकाळी 8 वाजल्यापासून ते दिनांक 29 जुलै 2024 सकाळी 8 वाजेपर्यंत खालील ठिकाणी जाण्यासाठी ठिकाणनिहाय पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करीत आहे. या सदर आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत इत्यादींनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी आणि पोलीस विभागाने उपरोक्त ठिकाणी कायमस्वरुपी किंवा फिरता बंदोबस्त तैनात करावा. वन विभागाने त्यांचे अख्त्यारीतील सर्व पर्यटन स्थळे याठिकाणी कायमस्वरुपी गार्डची नियुक्ती करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती, पर्यचक हे भारती न्याय संहिता 2023 चे कलम 223 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहणार आहे. ( Prohibitory order at tourist spots in Maval taluka ban till Monday 29th July )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News