पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळशी तालुक्यात देखील जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अशात जोरदार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुणे-रायगड मार्गावरील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ही दरड हटविण्याते काम सुरू आहे. तोपर्यंत घाट रस्ता साधारण 4 ते 5 तास बंद राहिल असा अंदाज आहे. ताम्हिणी घाटातून रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणांनी याबाबत नोंद घ्यावी. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस तसेच खाजगी प्रवासी वाहने या मार्गावरून प्रवास करणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ( crack fell in tamhini ghat mulshi pune ghat road was closed )
अधिक वाचा –
– अजित पवारांकडून मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा आढावा । Ajit Pawar
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News