मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी ट्विट ( Tweet ) करुन याबद्दल माहिती दिली आहे. ( NCP Jitendra Awhad Will Resign as MLA Soon As Police Filed Fake Cases Against Him Within 72 Hours Know Detail Tweet )
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असे ट्वीट आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awhad ) यांनी केले आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असेही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलेत जितेंद्र आव्हाड?
“पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
संपूर्ण प्रकरण काय?
‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करत असताना ठाण्यातील विवियाना मॉलमधील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( NCP Jitendra Awhad Will Resign as MLA Soon As Police Filed Fake Cases Against Him Within 72 Hours Know Detail Tweet )
अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाळा भेगडेंवर मोठी जबाबदारी !
– मावळ तालुका बजरंग दलाकडून प्रतापगडावरील कारवाईचे स्वागत, राज्य सरकारकडे केली ही मागणी