Dainik Maval News : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा शुक्रवार, दिनांक 26 जुलै रोजी बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संपूर्ण राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार ठिकठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना शुक्रवारी, 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय लोणावळ्यातही पावसाचा जोर कायम असून खबरदारी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळ्यातील बारावी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये 26 आणि 26 जुलै रोजी बंद राहणार आहेत. ( All schools in Pune district have been declared holiday due to heavy rain warning )
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या 26 जुलै, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News
– पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News
– पवन मावळाला मुसळधार पावसाने झोडपले ! हंगामातील विक्रमी पावसाची नोंद, एका दिवसात पवना धरणात 13 टक्क्यांची वाढ