Dainik Maval News : प्रियकराने मृत प्रेयसीचा मृतदेह पाण्यात फेकत असताना तिच्या दोन जिवंत लहान मुलांनाही पाण्यात फेकल्याची संतापजनक घटना मावळ तालुक्यात घडली होती. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. 22 जुलै रोजी ही घटना समोर आली. तेव्हापासून दोन मुले आणि त्यांनी आई या तिघांचाही इंद्रायणी नदीपात्रात पोलिस प्रशासन आणि स्थानिक आपदा दल यांच्या माध्यमातून शोध सुरू होता. परंतु मावळात गुरूवारी अतिवृष्टी होऊन इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे हे शोधकार्य आता थांबविण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र मावळ, पोलिस यांच्या पाच टीमने सलग तीन दिवस माय लेकरांचा शोध घेतला. मात्र, अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. समरीन हिच्या मृतदेहासह दोन चिमूरड्या मुलांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या पाच टीम नदीमध्ये उतरल्या होत्या. सलग तीन दिवस शोधकार्य करूनही टीमला यश मिळाले नाही. बुधवारी (दि. 24) रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे टीमला माय लेकरांचा शोध घेणे कठीण झाले. तसेच, एनडीआरएफच्या जवानांना माघारी बोलवल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. ( Maval Taluka Triple Massacre Search stopped in Indrayani river Talegaon MIDC Police )
समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (वय 5), इजान (वय 2) अशी शोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
“एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या टीमकडून तीन दिवस शोध मोहीम घेण्यात आली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.” – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी पोलिस)
अधिक वाचा –
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News
– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam
– Breaking News : मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News