Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा कान्हे येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे गुरुपूजन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पाद्यपूजन करत शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांचेसह सर्व शिक्षक बांधव आणि महिला शिक्षिका यांना भेटवस्तू देऊन सर्वांना वंदन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेणूका सातकर, सदस्या शिक्षणप्रेमी आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे, नंदिता दास, सविता दोडे यांनी सर्व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष समीर सातकर यांनी सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ( Guru Poornima celebrated at Zilla Parishad Primary School Kanhe )
कार्यक्रमाचे शेवटी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्वासाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. शाळेतील सहकारी शिक्षक दादासाहेब खरात यांनी गुरुपौर्णिमेची आठवण ठेवून कान्हे शाळेच्या सर्व गुरुजनांचे आदरपूर्वक गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा म्हणून भेटवस्तू देत शिक्षक बंधू भगिनींचा सन्मान केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक बंधूभगिनींच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे मनस्वी आभार मानले.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘दाभाडे’च । Talegaon Dabhade
– आनंदाची बातमी ! गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 कोटी 70 लाखापेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
– आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान