Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार आणि कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम मावळ तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहेत. वडगाव मावळ येथील महाविकास आघाडी कार्यालय येथे माजी आमदार पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी, विधानसभा निवडणूकमध्ये महाविकासआघाडी उमेदवार निवडून आण्यासाठी कामाला लागा, आघाडी जो उमेदवार देईल त्याच काम एकनिष्ठेने करा. मावळ तालुका हा शरद पवार यांच्या बरोबर आमदार नसताना देखील राहिला आहे. मावळच्या विकासासाठी साहेबांनी यापुर्वी बरेच काही दिले आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवा. पक्ष संघटनात्मक बांधणी, बुथ सक्षमीकरण, ग्रामकाँग्रेस कमिटीची स्थापना करणे, मतदार यादी नोंदणी कार्यक्रम, विविध अडचणी या संदर्भात माहिती घेऊन सर्वांना मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी केले. ( Review meeting of Maval Taluka NCP Sharad Chandra Pawar party at Vadgaon )
मावळ तालुक्यात आगामी विधानसभेतील आमदार हा महविकास आघाडीचाच असेल, असा आशावाद माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात गाव भेट दौरा काढत कार्यकर्त्यांच्या गाठी भेट घेणार, बूथ कमिटी अधिकाधिक मजबूत करणे व पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करतील असे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
पक्षाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या “शिवस्वराज्य यात्रेची” सुरुवात जुन्नर येथून किल्ले शिवनेरीवरून होणार आहे, या यात्रेच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहे, असे मावळ तालुका प्रभारी व पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत यांनी सांगितले. बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. यावेळी मावळ तालुक्यातून तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या नावाचा विचार विधानसभेसाठी होवो हि भावाना कार्यकर्तेनी बोलून दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळ विधानसभा युवक अध्यक्ष विशाल वहिले व आभार लोणावळा महिला अध्यक्षा श्वेताताई वर्तक यांनी मानले. या वेळी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, तालुका महिला अध्यक्षा जयश्रीताई पवार, सर्व शहराध्यक्ष, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीतील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade