मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रश्न, समस्यांबाबत चर्चा-विमर्श करण्यासाठी संयुक्त आढावा बैठक पंचायत समिती सभागृह वडगाव मावळ येथे सोमवारी (14 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली. ( MLA Sunil Shelke Held Gram Panchayat Review Meeting At Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी, गाव पातळीवरील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आंबी, नवलाख उंब्रे, नाणोली, आंबळे, साते, कान्हे, कामशेत, कुसगाव खु, या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. या संयुक्त बैठकीत गावामध्ये सुरु असलेली आणि आगामी काळात करावयाच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सुनिल शेळकेंसमवेत गटविकास अधिकारी सुधीर भागवत, कृषी अधिकारी संताजी जाधव, मा जि.प. सदस्या श्रीमती शोभा कदम आणि सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोनद्वारे शूटींग, गुन्हा दाखल I Lonavla Crime
– बऊरमध्ये श्रीगणेश मूर्ती प्राण-प्रतिष्ठा सोहळा संपन्न, हभप सचिन महाराज जाधव यांच्या कीर्तनाला हजारोंची उपस्थिती