सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. ( Farmers Deadline to apply for Battery Operated Spray Pump is now extended till 14th August apply now )
शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज करणेबाबतची कार्यवाही :
अर्ज करणे साठी वेबसाईट – https://mahadbt.maharashtra.gov.in
– लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे
– “अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
– “कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
– “मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
– “तपशील” बाबीवर क्लिक करून –
– “मनुष्यचलित औजारे घटक निवड”
– “यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”
– “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे
– जतन करणे
अधिक वाचा –
– बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News
– वडगाव शहरातील अग्निशमन विभाग बनला अधिक सक्षम, ताफ्यात नव्या ‘फायर बुलेट’चा समावेश, वाचा खासियत । Vadgaon Maval
– संत नामदेव महाराज यांच्या 674 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तळेगावात विविध धार्मिक कार्यक्रम । Maval News