व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News

तरुणांना योग्य दिशा मिळाली नाही, आणि तो भरकटला तर त्याचा परिणाम वाईट होतो - आमदार सत्यजित तांबे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 7, 2024
in लोकल, शहर
Lonavala police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट, लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा पोलीस व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प नशा मुक्ती (Drugs Free Lonavla)’ या सामाजिक चळवळीचा प्रारंभ व माहिती पत्रकाचे अनावरण संपन्न झाले. आमदार सत्यजित तांबे, मावळचे आमदार सुनील शेळके, आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नशामुक्ती संदर्भात करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारत तरुणांचं देश आहे, पण तरुणांना योग्य दिशा मिळाली नाही, तो भरकटला तर त्याचा परिणाम वाईट होतो, ज्याचा अनुभव आपण बांगलादेश मध्ये सध्या जे चालले आहे त्यातून घेत आहे. त्यामुळे योग्य वयातच तरुणांना, त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या क्रयशक्तीला योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. ( MLA Sunil Shelke Satyajit Tambe unveiling Sankalp Nasha Mukti campaign information sheet in Lonavala )

सामाजिक भान जपत सुरु केलेली ही चळवळ नक्कीच आदर्शवत आहे. चळवळीत आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. सध्याची तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाची तरुण पिढी निरोगी, सुदृढ असेल तरच देश सशक्त होऊ शकतो. प्रशासन, पालक व समाजातील जागरुक नागरिक या नात्याने आपण अशा समस्येचा समुळ नाश करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. या समस्येच्या चळवळीमध्ये सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. व्यसनाच्या आहारी जाण्यापासून तरुणाईला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीला रोखण्याचे आव्हान आपल्या यंत्रणांसमोर देखील आहे. मागील काही महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई करत कठोर पावले उचलली याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. – आमदार सुनिल शेळके

यावेळी लोणावळा काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ऍड. निलिमा खिरे, सहसचिव ऍड. अजय भोईर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, जयहिंद लोकचळवळीचे शहराध्यक्ष चैतन्य वाडेकर, विशाल विकारी, जकीर खलीपा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शेतकऱ्यांनो… बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज
– मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय ! राज्यातील ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार, केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार
– सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेची घोषणा, 31 ऑगस्टपूर्वी करा अर्ज, वाचा अधिक


Previous Post

चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News

Next Post

रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच मावळच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे फराळ वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ravindra Appa Bhegde Yuva Manch Maval

रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच मावळच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे फराळ वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.