Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या माध्यमातून आज, बुधवार ( दि. 14 ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत CRPF चे 500 जवान, 242 बटालियनचे 100 जवान, CRPF चा बँड पथक, भारत मातेचा आकर्षक चित्ररथ, 700 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सकाळी 9:30 वाजता या तिरंगा रॅलीला तळेगाव स्टेशन येथून सुरूवात झाली. त्यानंतर लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथे रॅलीची सांगता झाली. एसटी स्टँड तळेगाव स्टेशन येथून सुरुवात तळेगाव स्टेशन चौक, अमरहिंद चौक, खांडगे पेट्रोल पंप, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, गणपती चौक, बाजारपेठ मार्गे, मारुती मंदिर चौक आणि सुशीला मंगल कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली.
यावेळी रोटरी कल्ब तळेगाव शहराचे संस्थापक विलास काळोखे, भाजपाचे विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, क्लबचे अध्यक्ष किरण ओसवाल, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाचे पीआयजी वैभव निंबाळकर, प्रोजेक्ट मॅनेजर प्रदीप टेकवडे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल, उपाध्यक्ष रो. भगवान शिंदे, सेक्रेटरी रो. सुरेश दाभाडे, एडमिन रो. संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख रो. प्रदीप टेकवडे यांनी रॅलीच्या यशस्वितेसाठी नियोजन केले.
अधिक वाचा –
– हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval
– राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
