Dainik Maval News : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी 7 वा. 45 मि. नगरपंचायत प्रांगणात माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. प्रविण लक्ष्मण निकम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहरातील नागरिक, मान्यवर, शालेय विद्यार्थी,अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्या समवेत राष्ट्रगीत, राज्यगीत, तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शहरातील शूरवीर माजी सैनिक यांचा नगरपंचायत च्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” अंतर्गत श्रीमंत महादजी शिंदे उद्यान येथील कोणशीलेचे पुजन, पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जावनांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची ओळख म्हणून व तसेच नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढवणे च्या अनुषंगाने श्रीमंत महादजी शिंदे उद्यान ते मिलिंद नगर ते मातोश्री हॉस्पिटल चौक ते नगरपंचायत पूर्वेकडील कमान ते मोरया कॉलनी ते तळेगाव चौक, पुणे मुंबई हायवे ते तहसील ऑफिस ते नगरपंचायत कार्यालय या ठिकाणाहून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर उपक्रमास सुमारे 300 नागरिकांचा सहभाग होता.
त्याच प्रमाणे दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा” अंतर्गत नगरपंचायत प्रारंगणात ध्वजारोहण करण्यात आले, सेल्फी विथ तिरंगा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा दोड, तिरंगा प्रभात फेरी, तिरंगा ध्वज वाटप, तिरंगा कॅनव्हास आदी उपक्रम घेण्यात आले होते. सदर उपक्रम शून्य कचरा निर्मितीच्या अनुषंगाने राबविण्यात आले यामध्ये सर्व झेंडे कापडी वापरण्यात आले, कागदी पताका, फुले, हार यांचा वापर करण्यात आला होता कोणत्याही प्रकारचे एकलवापर प्लास्टिक किंवा आधी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही.
अधिक वाचा –
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News
– मोठी बातमी ! आता लोणावळ्याशिवाय होईल मुंबई – पुणे प्रवास, मध्य रेल्वेकडून दोन नवीन मार्गांचे प्रस्ताव – वाचा सविस्तर
– तळेगावमध्ये मतदार नोंदणी अभियान, भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू । Talegaon Dabhade