Dainik Maval News : गुरूवारी, दि. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कान्हे फाटा, ता. मावळ येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक हेही उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रुद्राक्ष क्लिनिक आणि प्रमोदिनी टपाले यांच्या सहकार्यातून हे रक्तदान व आरोग्य शिबिर इको व्हॅली सोसायटी येथे संपन्न झाले. यावेळी शिबिरात एकूण 75 नागरिकांनी रक्तदान केले. तर, 200 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. यावेळी प्रत्येक रक्तदात्यात एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. चाकण ब्लड बँक च्या डॉ. ऐश्वर्याताई काळे यांनी आणि टीमने यावेळी विशेष योगदान दिले.
विशेष बाब म्हणून या कार्यक्रमाला असलेले प्रमुख अतिथी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनीही यावेळी रक्तदान करून उपस्थित दात्यांचा उत्साह वाढविला. यावेळी विविधी क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, कान्हे गावातील आजी-माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. सकाळी 10 वाजता सुरू झालेले शिबिर सायंकाळी 5 वाजता संपले. प्रमोदिनी टपाले आणि डॉ. ऐश्वर्या काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News
– मोठी बातमी ! आता लोणावळ्याशिवाय होईल मुंबई – पुणे प्रवास, मध्य रेल्वेकडून दोन नवीन मार्गांचे प्रस्ताव – वाचा सविस्तर