Dainik Maval News : छत्रपती शिवराय यांचे गडकिल्ले टिकले पाहिजे या करिता प्रयत्न करणाऱ्या दुर्गसेवकांसाठी मोरया प्रतिष्ठान व सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग पुणे, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गसंवर्धन एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यामध्ये प्रथमच दुर्ग संवर्धनाची कार्यशाळा घेण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या सहकार्याने आपण दरवेळेस नवनवीन उपक्रम घेत असतो. आपल्या मावळ तालुक्यातील ज्या संघटना गडदुर्गांवरती निस्वार्थीपणे काम करतात त्यासाठीची हि दुर्गसंवर्धन कार्यशाळा भरवण्यात आली होती. यातून दुर्ग संवर्धन कसे करावे व कोणत्या पद्धतीत करावे याची माहिती त्यांना देण्यात आली. पुरातत्व विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गडकोटांवर काम करू नका असे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. या कार्य शाळेत मावळ, भिवंडी, सासवड, जुन्नर येथील दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थाच्या सुमारे १०० सभासदांनी सहभाग नोंदविला होता. ( On behalf of Morya Pratishthan Vadgaon first fort conservation workshop in Maval taluka )
यामध्ये डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक डॉ सचिन जोशी सर आणि राज्य पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे श्री. विलास वाहने, शिवाजी ट्रेल संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिरसागर यांनी पुरातत्व खात्यामार्फ़त चालू असलेली जागतिक वारसा नामांकन प्रचारासाठी चालू असलेल्या मोहिमेबद्दल तसेच दुर्गसंवर्धन चालू कार्यावर विस्तृत माहिती दिल्याने त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वन्य जीव संरक्षण समिती सदस्य सर्प मित्र जिगर सोळंकी यांनी दुर्गसंवर्धन मोहिमेदरम्यान सर्प दंश झाल्यावर कश्या स्वरूपात मदत करावी. तसेच अनेक गड किल्ल्यांवर वावरणाऱ्या विविध जातींच्या सर्पा विषयी छान माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमात शिवाजी ट्रेल संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिरसागर यांनी आपल्या वडगाव मधील दुर्गसेवक किरण चिमटे यांच्या मातोश्री चिमटे काकू यांना संस्कृती जतन पुरस्कार देऊन सन्मानित केले. याप्रसंगी गडकिल्ले दुर्ग संवर्धन समितीची सदस्य डॉ. सचिन जोशी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र यादव सर, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, शिवाजी ट्रेलचे अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर, इतिहास अभ्यासक प्रमोद बोराडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढोरे, वन्य जीव संरक्षण समिती सदस्य सर्प मित्र जिगर सोळंकी, सचिन ढोरे, गणेश जाधव, किरणजी चिमटे, नितीन चव्हाण आणि दुर्ग संवर्धन संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय – एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय
– मोठी बातमी ! लोणावळा शहरात ‘ओला’ ‘उबर’ सारख्या ऑनलाईन टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी, मंत्रालयातील आढावा बैठकीत निर्णय । Lonavala News
– खोपोलीकरांनी रचला इतिहास, आसमंतात फडकवला प्रचंड मोठ्या आकाराचा तिरंगा ध्वज । Khopoli News