Dainik Maval News : संकल्प नशामुक्ती अंतर्गत लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अंमली पदार्थ तसेच जुगार तत्सम बेकायदेशीर प्रकाराच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. याच अभियानाअंतर्गत कामशेत पोलिसांनी गुरुवारी धडाकेबाज कारवाई करीत 4 जणांना अटक केले, तसेच त्यांच्याकडील 98 किलो गांजासह तब्बल 56 लाख 92 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक 22 ऑगस्ट) रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुन्या हायवे वरून ताजे गावातून पुढे मळवली, लोणावळाकडे 4 व्यक्ती त्यांच्या ताब्यातील कारमधून गांजांची वाहतूक करणार आहे. पाटील यांनी वरीष्ठांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करून पंचांच्या उपस्थितीमध्ये सापळा लावला. ( big operation by Kamshet police 98 kg of ganja and worth 56 lakh were seized 4 people arrested )
मिळालेल्या बातमीप्रमाणे एक वेरना कार (क्र.एम.एच/14/जी.वाय/0550) हि जुन्या हायवे मार्गे ताजे गावाकडे आलेली दिसली. त्यावेळी कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये एकूण 98 किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला.
पोलिसांनी कारमधील अभिषेक अनिल नागवडे (वय 24), प्रदिप नारायण नामदास (वय 25 वर्षे), योगेश रमेश लगड (वय 32 वर्षे) व वैभव संजीव चेडे (वय 23 वर्षे, सर्व रा.पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांव, ता. शिरूर, जि.पुणे) यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळ एकुण 48 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 98 किलो वजनाचा गांजा, 8 लाख रूपये किंमतीची वेरना कार आणि 42 हजार रूपये किंमतीचे 3 मोबाईल हँडसेट असे एकूण 56 लाख 92 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वरील चारही आरोपींच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) 20 (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. नि. रविंद्र पाटील हे करीत आहेत.
कामशेत पोलिसांनी केलेल्या सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, राजू कोळी, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी सहभाग घेतला होता.
अधिक वाचा –
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात