Dainik Maval News : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे पदाधिकाऱ्यांकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बदलापूर (जि. ठाणे) येथे मागील आठवड्यात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्य बंदला उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.
मावळ तालुक्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमाटणे येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना उबाठाचे पदाधिकारी भरत ठाकूर, रवींद्र गायकवाड, भरत भोते, युवराज सुतार, राहुल नखाते, संतोष ढोरे हे यावेळी उपस्थित होते. बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली. ( Shiv Sena UBT Party condemns Badlapur atrocities in Somatne Phata Maval News )
अधिक वाचा –
– BREAKING : कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News