Dainik Maval News : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कामशेत पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामशेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा, पंडित नेहरू विद्यालय, जैन इंग्लिश स्कूल येथील शाळांना भेट दिल्या आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी पदाधिकाऱ्यांनी शाळेत सखी सावित्री समिती, विशाखा समिती स्थापन करणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभी करणे, महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, शाळा सुटताना प्रथम मुली आणि दहा मिनिटांनंतर मुलांना सोडणे, शाळेत काही चुकीची घटना घडल्यास त्वरित पोलिसांना सुचित करणे आदी सुचना दिल्या, तर, कामशेत पोलिसांना दिलेल्या निवेदनात रोड रोमिओ, शाळेच्या आवारात थांबणारी आणि मुलींची छेड काढणाऱ्या मुलांवर कडक कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या. ( Statement of NCP Sharad Pawar group to Kamshet police in the wake of Badlapur incident )
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष वीर, संतोष राक्षे, युवा अध्यक्ष सुरज पुरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित शिनगारे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोईन खान, नितीन गायकवाड आदी जण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News
– ‘होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन’कडून आंदर मावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे धडे । Maval News