Dainik Maval News : गणेशोत्सव काळात मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यांमुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविंद्र भेगडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रत्येक ठिकाणी रविंद्र भेगडे यांचे कार्यकर्ते ‘आप्पा, यंदा माघार नाही’ हे प्रचारगीत वाजवून शेकडोंच्या संख्येने गणेश आरतीच्या वेळी कार्यकर्ते उपस्थित राहत होते. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये रवी भेगडे यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र रवी भेगडे यांनी माघार घेऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आक्रमक झाल्याचे गणेशोत्सवांच्या भेटी दरम्यान प्रकर्षाने जाणवले.
माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब गाडे म्हणाले की, ‘यंदा मावळ विधानसभेसाठी रविंद्र आप्पा भेगडे यांना संधी द्यावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. गेल्या 5 वर्षांपासून रविंद्र भेगडे यांनी मावळमध्ये भाजपचा पुन्हा झंझावात उभा केला आहे. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी मावळमध्ये भाजपाचा झेंडा फडकवायचा असा निर्धार कार्यकर्त्यांचा आहे.”
देहू शहर भाजपाचे अध्यक्ष मच्छिंद्र परंडवार म्हणाले की, “जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देहू नगरीचा लौकिक आहे. वारकरी संप्रदायातील एक प्रमुख केंद्र असलेल्या देहूचा विकास गेल्या 5 वर्षांपासून जैसे-थे स्थितीत आहे. देहूचे बकालीकरण वाढत असताना , अनेक नागरी समस्यांमुळे देहूकर त्रस्त आहेत. अशा वेळेस रवी आप्पा यांच्यासारखा एक स्वच्छ प्रतिमेचा चेहराच आता मावळ विधानसभेसाठी येथील मतदार निवडून देतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो.”
अधिक वाचा –
– आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News
– कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाला माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी । Maval News
– गणेशोत्सवात रविंद्र भेगडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News