Prime Minister Narendra Modi visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 ( पहाटेचे 00.00) वाजल्यापासून ते 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 (24.00) वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
सदर आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात, 6 जण जखमी । Lonavala News
– शिवसेनेच्या आमदार आणि भाजपाच्या खासदाराविरोधात मावळ तालुका काँग्रेसचे आंदोलन ; गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे