Dainik Maval News : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने पुढाकार घेवून त्वरित सोडवावे, अशी मागणी अखंड मराठा समाज मावळ यांनी तहसीलदार मावळ यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा (दि.20) चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. तसेच त्यांनी उपचारास नकार दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गरवंत मराठ्यांना 50 टक्के च्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील वर्षभरापासून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी सहावेळा आमरण उपोषण केले आहे. मनोज जरांगे यांची खालावत चाललेली तब्येत पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता स्वतः पुढाकार घेऊन मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी विनंती निवेदनातून अखंड मराठा समाज मावळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
1. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी,
2. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे,
3. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत,
4. कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे,
5. ईडब्लूएस सह एसईबीसी किंवा कुणबी ओबीसी हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा,
6. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा
अधिक वाचा –
– भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News
– विजयकुमार सरनाईक यांनी स्विकारला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार । Talegaon Dabhade