Dainik Maval News : युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी निवड झालेल्या मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड सहित राज्यातील 11 किल्ल्यांवर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व लाखों जिवाभावाच्या मावळ्यांच्या बलिदान व पराक्रमाचे जिवंत स्मारक असणाऱ्या 12 गडकोटांचे युनेस्को कडे जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. युनेस्कोचे शिष्टमंडळ 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान या सर्व 12 किल्ल्यांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. यात महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 असे 12 किल्ल्यांचा समावेश आहे.
- विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील 11 पैकी शिवजन्मभुमी शिवनेरी, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, 3 किल्ले पुणे जिल्ह्यातील आहेत. या पार्श्वभूमीवर गडकोटांचे अधिष्ठान असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कडून महाराष्ट्रातील या सर्व 11 किल्ल्यांवर रविवार 22 सप्टेंबरला स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या सर्व किल्ल्यांची पाहणी व आढावा घेण्यासाठी युनेस्कोचे विशेष पथक 27 सप्टेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोहगड सहित शिवनेरी व राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या पुणे विभागातील सर्वच शाखा, तसेच तमाम शिवभक्त व इतर सर्व संस्थानांसह रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. गडकोटांचे जतन संवर्धन च्या जनजागृती साठी राज्यभरात विविध ठिकाणी संस्थान मार्फत स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आले आहे.
युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी निवड झालेल्या 12 किल्ल्यांची यादी ;
शिवनेरी (पुणे जिल्हा)
राजगड (पुणे जिल्हा)
लोहगड (पुणे जिल्हा)
रायगड (रायगड जिल्हा)
खांदेरी (रायगड जिल्हा)
सुवर्णदुर्ग (रत्नागिरी जिल्हा)
सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग जिल्हा)
विजयदुर्ग (सिंधुदुर्ग जिल्हा)
साल्हेर (नाशिक जिल्हा)
पन्हाळा (कोल्हापूर जिल्हा)
प्रतापगड (सातारा जिल्हा)
जिंजी (तमिळनाडू)
अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन