व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव ते ओवळे एसटीबाबत विद्यार्थ्यांचे प्रशासनाला निवेदन ; फेऱ्या वाढविण्यासह चांगली बस पाठविण्याची विनंती । Maval News

तळेगाव ते ओवळे मार्गावरील एसटी बसबाबत तहसीलदार मावळ, तळेगाव दाभाडे आगार प्रमुख आणि शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन यांना विद्यार्थी आणि प्रवाशांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon to Owle ST bus

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव ते ओवळे मार्गावरील एसटी बसबाबत तहसीलदार मावळ, तळेगाव दाभाडे आगार प्रमुख आणि शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन यांना विद्यार्थी आणि प्रवाशांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. भाजपाचे बाळासाहेब घोटकुले यांनी याबाबत पुढाकार घेवून ओवळे येथे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या, मुक्कामी एसटी बस सुरू करणे, सुटीच्या दिवशी बस पाठविणे आदी विषयांबाबत निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रेय माळी, सरपंच ऋषिकेश कारके, तुषार साठे, रामभाऊ गोपाळे यांसह विद्यार्थी, प्रवासी यावेळी उपस्थित होते. एसटी आगार प्रमुखांनी प्रवाश्यांच्या मागण्यांवर आठ दिवसांमध्ये कार्यवाही केली नाही तर एसटी आगारामधून एकही बस बाहेर पडून देणार नाही, असा इशारा बाळासाहेब घोटकुले यांनी दिला आहे.

प्रमुख अडचणी आणि मागण्या
1. ओवळे ते तळेगाव एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
2. रविवार आणि सुटीच्या दिवशी तळेगाव डेपोतून येणारी बस बंद करण्यात येते. यामुळे आठवडे बाजारासाठी आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.
3. ओवळे येथे कायमस्वरुपी मुक्कामी एसटी बस सुरू करावी.
4. सुटीच्या दिवसातही बसची फेरी कायम ठेवावी.
5. सुस्थितीत असणारी बस तळेगाव ते ओवळे मार्गावर पाठवावी.
6. दुपारी एक वाजताची बेबडओहोळ एसटी वेळेवर सोडावी, जेणेकरून सोमाटणे, परंदवडी, बेबडओहोळ, पिंपळखुटे, शिवणे येथील मुले या एसटीने जातील.

ओवळे ते तळेगाव एसटी वेळेवर येत नसल्यामुळे शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वेळेत न पोचल्यामुळे नुकसान होते. आसन मर्यादा 50 ते 55 एवढी असताना 130 ते 135 प्रवासी असतात. गर्दीमुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नाही. मुली व महिलांना गर्दीत प्रवास करावा लागत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्यामुळे काही अनर्थ घटना घडण्याची ठाक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा व एसटी आगारमधून एकही एसटी बाहेर पडून देणार नाही, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

Next Post

कान्हे उपजिल्हा रूग्णालयाला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याचा ठराव, आमदारांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Statement to MLA Sunil Shelke

कान्हे उपजिल्हा रूग्णालयाला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याचा ठराव, आमदारांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.