व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पवार साहेबांच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देण्याचा डाव…’ आमदार सुनिल शेळकेंचा गंभीर आरोप, मावळचे राजकारण तापले

आमदार सुनिल शेळके यांनी भाजपावर गंभीर आरोप केल्यामुळे मावळ विधानसभेच्या जागेमुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 22, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Maval MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शेळके हे आमदार आहेत. परंतू पारंपारिकदृष्ट्या मावळ मतदारसंघ हा भाजपाकडे राहिल्याचे दिसते. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणूकीपूर्वी मावळात महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान युतीकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसताना, जागा वाटप जाहीर झालेले नसताना मावळ विधानसभेत भाजपाकडून होत असलेल्या हालचालींबद्दल आमदार सुनिल शेळके यांनी आपले मौन सोडले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “लोकसभेच्या निवडणूकीला जे अजितदादांच्या कामाबद्दल बोलत होते, आमदाराच्या कामगाराबद्दल बोलत होते, तेच आता गावोगावी जाऊन सांगत आहेत की, अजित पवारांनी गोळीबाराचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही. अशा प्रकारचे आता बोलू लागल्यामुळे याला राजकीय वास येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना भडकवायचे आणि संभ्रमित करायचे काम सुरू आहे. आपण पक्षाचे निष्ठावंत असल्याचे सांगायचे, मात्र आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे.

  • मावळ तालुक्यामधील भाजपाचे काही ठराविक कार्यकर्ते शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीदरम्यान केला. तुतारीच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देऊन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करू नये, असे शेळकेंनी बजावले आहे. तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे. तो सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. असे म्हणत पिंपरी आणि मावळच्या भाजपा कार्यकर्त्यांचे आमदार सुनील शेळके यांनी कान टोचले आहेत.

भाजपातील काहीजण गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असे सांगत आहेत. मागच्या दीड वर्षात असं ते कधीही बोललेले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म महत्त्वाचा आहे. तो पाळून आपण काम केले पाहिजे, असं म्हणणारी भाजपा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये महायुतीचा धर्म पाळून आपण काम केले पाहिजे, असे जे बोलत होते. तेच आता मावळमधील गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी गोळीबार केला. शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्या पक्षाला मदत करू नका असा प्रचार करत आहेत., असे सुनील शेळके यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वांत अगोदर विरोध करणाऱ्या सुनिल शेळके यांना आगामी विधानसभा निवडणूक सोपी जाईल, असे दिसत नाहीत. महायुतीत जी धुसपूस सुरू झाली आहे. त्यातून शेळकेंना स्वपक्षीयांसोबतच महायुतीतील नेत्यांचे आव्हान पेलावे लागेल, असी परिस्थिती दिसत आहे. त्यात आमदार सुनिल शेळके यांनी भाजपावर गंभीर आरोप केल्यामुळे मावळ विधानसभेच्या जागेमुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम

Next Post

पीएमआरडीएकडून मावळातील रस्त्यांसाठी 123 कोटींचा निधी, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश । MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne

पीएमआरडीएकडून मावळातील रस्त्यांसाठी 123 कोटींचा निधी, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.