Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कल्हाट,पवळेवाडी या गावांतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके, स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एकूण दोन कोटी निधीतून गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे व काँक्रिटीकरण करणे या कामांचा यामध्ये समावेश आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आमदार शेळके यांचे स्वागत केले. सोबत माता-भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. या भूमिपूजन समारंभास आमदार सुनिल शेळके, हभप रोहिदास महाराज धनवे, गणेश कल्हाटकर, सरपंच शिवाजी करवंदे, उपसरपंच देविदास धनवे, नारायणराव ठाकर, देवाभाऊ गायकवाड;
रुपेश घोजगे, ज्ञानेश्वर महाराज ठाकर, भाऊसाहेब जाचक, मारुती करवंदे, तानाजी करवंदे, भरत जोरी, शांताराम जगताप, बळीराम भोईरकर, दिगंबर आगिवले, काळुराम भोईरकर, भीमाशंकर लोटे, रविंद्र पवार, गोपाळ पवळे तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke