व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उत्पति एकादशी आणि आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देहूगाव येथे प्रशासनाची जय्यत तयारी । Dehu News

देहू नगरपंचायत प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन यांच्यातील नियोजन आढावा बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 21, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Kartiki Ekadashi planning review meeting concluded between at Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुढील आठवड्यात मंगळवारी ( दि. 26 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपन्न होणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा तथा आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहूगाव येथे आगमन होणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, सोयीसुविधा आणि नियोजनासाठी सोमवारी नगरपंचायतीत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, अभियंता संघपाल गायकवाड, शहर समन्वयक अक्षय रोकडे, नगररचना प्रमुख सुरेंद्र आंधळे, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, तळवडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात आदी उपस्थित होते.

कार्तिक एकादशी निमित्त पुण्यनगरी देहूत श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शनार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे आगमन होत असते. भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदीचा घाट परिसर, गावातील अंर्तगत रस्ते स्वच्छता, डीडीटी पावडर औषध फवारणी, धूर फवारणी केली जाणार आहे.

मंदिर परिसर स्वच्छ करणे, बंद पथदिवे सुरू करणे, महावितरणाकडून गर्दी व धोकादायक ठिकाणचे लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, उघड्या डीपी बॉक्स दुरुस्ती संदर्भात उपाय योजना करणे, मंदिर परिसरामध्ये सी सी कॅमेरे सज्ज करणे, दर्शनार्थ भाविकांना दर्शन बारीतून सोडणे, कोकणातुन येणाऱ्या तसेच मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांना शासकीय, निमशासकीय शाळा, कार्यालय उपलब्ध करून सोयीसुविधा करणे, नदी घाट परिसरात जीवरक्षक तैनात करणे, चेंजिंग रूम हिरकणी कक्ष उभारणे, पाणी टँकर पुरवठा, शौचालय उभारणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने औषधसाठा उपलब्ध करणे याबाबत नियोजन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र उभारणे, रुग्णवाहिका,अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, आदी कामांचे करण्याचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, वाहनतळ, बस थांबा, वाहतूक व्यवस्था करणे, अन्न औषध प्रशासनास हॉटेल व खाद्यपदार्थांची तपासणीसाठी पत्रव्यवहार करणे, यात्रा काळात चोरीच्या घटना घडू नये आणि भाविकांची सुरक्षितता यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha


Previous Post

एटीएम कार्डद्वारे 43 वर्षीय व्यक्तीची 81 हजारांची फसवणूक, देहूरोड येथील प्रकार । Maval Crime

Next Post

फायनल आकडा ! मावळ विधानसभेचा ‘कारभारी’ ठरविण्यासाठी 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी केले मतदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Enthusiasm for voting in Maval Assembly Constituency almost 50 percent voting completed till 3 pm

फायनल आकडा ! मावळ विधानसभेचा 'कारभारी' ठरविण्यासाठी 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी केले मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.