व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha

मावळ विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. 20) मतदान पार पडले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 21, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
sunil-shelke-bapu-bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. 20) मतदान पार पडले. मावळ मतदारसंघातील 402 मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान संपन्न झाले. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. परंतु लोणावळा व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्याने उशीरापर्यंत मतदान सुरु राहिले. अखेर रात्री उशीरा पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळात 72.10 टक्के मतदान झाले.

मावळ मतदारसंघात यंदा विक्रमी मतदान झाले. मावळ विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार संख्या 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 44 हजार 16 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर 1 लाख 34 हजार 414 महिला मतदारांनी मतदान केले. इतर दोन मतदार सहित एकूण 2 लाख 78 हजार 432 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय?
मावळ विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या 3 लाख 48 हजार 462 होती. त्यापैकी 2 लाख 47 हजार 963 मतदारांनी मतदान केले होते. त्यावर्षी म्हणजे 2019 साली 71.16 टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदान प्रथमच 72 टक्क्यांपेक्षा अधिक विक्रमी मतदान झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा 30,469 पेक्षा जास्त मतदारांनी यावेळी मतदान केले आहे. या वाढलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला होणार, सुनिल शेळके की बापूसाहेब भेगडे दोघांपैकी कोण बाजी मारणार, हे लवकरच समजेल.

2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीची आकडेवारी
मावळ विधानसभा निवडणूक – 2009
बाळा भेगडे (भाजपा) – 83,158 मते (मताधिक्य 14,318)
बापूसाहेब भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 68,840 मते
रमेश साळवे (आरपीआय – ए) – 15,160 मते

मावळ विधानसभा निवडणूक – 2014
बाळा भेगडे (भाजपा) – 95,319 मते (मताधिक्य 28,001)
माऊली दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 67,318 मते
किरण गायकवाड (काँग्रेस) – 17,624 मते

मावळ विधानसभा निवडणूक – 2019
सुनील शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 1,67,712 मते (67.58%) (मताधिक्य 93,942)
बाळा भेगडे (भाजपा) – 73,770 मते (29.73%)
वंचित बहुजन आघाडी उमेदवार – 2,738 मते

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha
– मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी


Previous Post

द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

एटीएम कार्डद्वारे 43 वर्षीय व्यक्तीची 81 हजारांची फसवणूक, देहूरोड येथील प्रकार । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

एटीएम कार्डद्वारे 43 वर्षीय व्यक्तीची 81 हजारांची फसवणूक, देहूरोड येथील प्रकार । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.