Dainik Maval News : बहुतेक जगात पहिल्यादांच युनेस्को च्या ( UNESCO ) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकाच वेळी 12 दुर्ग येणार आहेत. यातील 11 दुर्ग महाराष्ट्र राज्यातील असून 1 दुर्ग तामिळनाडू मधील जिंजी हा आहे.
युनेस्को च्या (UNESCO) शिष्ट मंडळाची या महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गडावर भेट असल्याने गड स्वच्छ रहावा यासाठी रविवारी (दि.22) रोजी शिवभक्तांच्या उपस्थितीत राज्यातील 11 गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता मोहीमेत सहभागी संस्था –
1. सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर, स्मार्ट सिटी व मुळशी विभाग
2. सह्याद्री स्मार्ट किड्स एंड कोचिंग क्लासेस
3. शिव शंभू कॅप्टन ग्रुप, पुणे (पुर्व भारतीय सैनिक)
गडावर करण्यात आलेल्या कामाची थोडक्यात माहिती –
1. गडावरील, पायरी मार्ग तसेच पायथा वरील सर्व कचरा उचलण्यात आला.
2. तटबंदी व बुरूजावरील गवत व बारीक झाडे शिडी, दोरीच्या सहाय्याने काढण्यात आले.
3. महावारसा उपक्रम संदर्भात जनजागृती साठी स्वाक्षरी मोहीम व पॅंप्लेट वाटप करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News
– मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडून किल्ले लोहगडाची स्वच्छता । Lohagad Fort
– पवन मावळ परिसरात एसआरटी लागवडीचे भातपीक जोमात ; यंदा उत्पन्न वाढणार । Maval Agriculture