Dainik Maval News : साते मावळ स्थित पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी च्या फार्मसी विभागाकडून बुधवारी (दि.25) रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा केला गेला. सदर कार्यक्रमा अंतर्गत फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी कामशेत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून प्रतिजैविके, नशामुक्ती, औषधांचा योग्य वापर आणि औषधे घेताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती केली.
त्यानंतर कामशेत मधील सर्व फार्मासिस्ट यांचा सत्कार केला गेला. कामशेत नगरीचे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय शिंदे आणि केमिस्ट असोसिएशन चे सागर येवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सागर कोरे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये डॉ. सविता देवकर , प्रा. मयुरेश राऊत, प्रा. हर्षदा पुराणिक, प्रा. दीपाली व्हनकडे प्रा.दीक्षिता पाटील,प्रा. आकांचा कुमारी, प्रा. अंकिता जटाले यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट चे सर्व विश्वस्त आणि संस्थचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र. कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी मार्गदर्शन केले आणि आवश्यक संसाधनांची पूर्तता केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम ; युनेस्कोचे शिष्टमंडळ करणार गडांची पाहणी । Maval News
– पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती
– खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News