व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !

पवना धरणग्रस्त शेतकरी ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन करावे या मागणीवर ठाम असून दोन एकरचा निर्णय अमान्य आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 2, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Pavana dam victims

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना धरणग्रस्त शेतकरी ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन करावे या मागणीवर ठाम असून दोन एकरचा निर्णय अमान्य आहे. पवनानगर येथील बैठकीत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांच्या उपस्थितीत एकमुखी मागणी करण्यात आली आहे

पवना धरणग्रस्तांना शासनाकडून पुनर्वसन म्हणून २ एकर पवना धरण परिसरात व २ एकर जमीन जिल्हात देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयात ता. १९/०५/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. या बैठकीचे इतिवृत्त धरणग्रस्तांना दिले होते. त्यानंतर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दि. १२/०६/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर व पुणे जिल्ह्यात दोन एकर याप्रमाणे प्रती खातेदारांना ४ एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु या बैठकीचे इतिवृत्त मागविले असता धरणग्रस्तांना केवळ दोन एकरच जमीन देण्याचा उल्लेख या इतिवृत्तात केल्याचे दिसून आले.

गेल्या दोन महिन्यात इतिवृत्त बदलून न आल्याने तसेच आजमितीस शासन दरबारी प्रती खातेदार दोन एकर जमीन देण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त समोर आले. यानंतर धरणग्रस्त पदाधिकारी व धरणग्रस्त खातेदार यांनी., ठरल्याप्रमाणे चार एकर प्रमाणेच पुनर्वसन व्हावे तसेच यादी दुरुस्ती करणे तसेच इतर तांत्रिक अडचणी सोडवुन परिपूर्ण प्रक्रिया करुन कोणत्याही खातेदारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पारदर्शक पध्दतीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासाठी अजुन कालावधी गेला तरी चालेल परंतु पुनर्वसनातील त्रुटी दूर केल्यानंतर प्रति खातेदार चार एकर प्रमाणे वाटप करावे, या मागणीवर ठाम असल्याचे जाहीर केले.

तसेच, प्रशासनाने धरणग्रस्तांना विचारात न घेता परस्पर दोन एकर क्षेत्र देणेचा घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे सांगून आमदार सुनील आण्णा शेळके यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती देऊन चार एकर प्रमाणे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेणार असाल तरच पुनर्वसन करावे, अन्यथा आम्हाला दोन एकर प्रमाणे वाटप मान्य नसल्याचे सर्वानुमते सांगितले आहे.

बैठकीला पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, उपाध्यक्ष राम कालेकर , रविकांत रसाळ, बाळासाहेब मोहोळ, सचिव बाळासाहेब काळे,किसन घरदाळे , लक्ष्मण भालेराव,दशरथ शिर्के, अँड संजय खैरे,दत्तात्रय ठाकर,संतोष कडू,संजय मोहोळ, मारुती दळवी,भाऊ दळवी,रवि ठाकर,संतोष भिकोले, यांच्यासह माता भगिनी व प्रमुख धरणग्रस्त उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व पदाधिकारी यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना भेटून ४ एकर प्रमाणे वाटप करावे अन्यथा दोन एकर वाटप मान्य नाही धरणग्रस्तांची ठाम भूमिका असल्याचे कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ब्रेकिंग : हिंजवडी – बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, तीन जणांचा मृत्यू । Helicopter Crashed At Bawdhan
– मावळ तालुक्यात यावर्षी विक्रमी भातपीक, चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा । Maval News
– वडगाव शहरातील ऐतिहासिक तलावाची स्वच्छता । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत येथील आश्रम शाळेतील 300 विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’चे धडे । Kamshet News

Next Post

ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान, राज्य सरकारचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shinde fadanvis pawar

ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान, राज्य सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.