व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या नियोजनबध्द विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 5, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
development works in Maval Taluka and Bhoomi Pujan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात लोणावळा सारखे पर्यटन स्थळ आहे, श्री एकवीरा देवी सारखे तीर्थ क्षेत्र असून तालुक्याच्या नियोजनबध्द विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार,यांनी केले.

मावळ तालुक्यातील कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजिुत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मावळ तालुक्याच्या विकासासाठी शासनाने ४ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे केली आहे. त्या तरतुदीतून अनेक विकास कामे सुरू आहेत. नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पीएमआरडीएकडून इंद्रायणी नदी साठी ७९३ कोटी रुपये तर पवना नदीसाठी १५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लोणावळा सारख्या पर्यटन स्थळी अधिकचे पर्यटक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. कार्ला येथील श्री एकवीरा देवी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना विविध सुविधासाठी,सर्व उपाय योजना करण्यात येत आहे. या तालुक्याचा विस्तार होत आहे. उद्योगांची वाढ होत असून अतिरिक्त सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

काल मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक बाब घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते दसरा दिवाळी सण लक्षात घेऊन १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील.

शासनाने सर्व सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली.मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या सारख्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील विद्यार्थांना शैक्षिणक मदत करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण तर विविध विकास कामाचे भूमिपूजन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कॅबिनेट बैठकीत पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता, एकूण 42 हजार 711 कोटींचा प्रकल्प । Pune Ring Road
– रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde


Previous Post

आई एकविरा देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन । Karla News

Next Post

दहा ऑक्टोबरच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही महिन्याचे हफ्ते जमा होणार – अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit Pawar Jan Snman Yatra

दहा ऑक्टोबरच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही महिन्याचे हफ्ते जमा होणार - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.