मावळ तालुक्यातील मुंढावरे ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या भारती नवनाथ थोरवे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकर्ते, समर्थक यांच्यासमवेत पक्षप्रवेश केला.
“राष्ट्रवादी परिवारात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध रहाल, अशी आशा बाळगतो”, असे यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले. ( Mundhaware Gram Panchayat Member Joined NCP Presence Maval MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी शेळकेंसमवेत, राष्ट्रवादी काँग्रेस मा कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, मा चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, प्रदेश सचिव अमोल केदारी, रोहिदास वाघमारे, सनी जाधव, गोरक्ष बांगर, सागर रणपिसे, नवनाथ थोरवे, किसन गरवड आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– BREAKING : पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या इर्टिगा कारचा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 3 गंभीर जखमी
– पवनानगर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वृक्षारोपण; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशीही साधला संवाद