व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव ते कामशेत सेवा रस्ता झालाच पाहिजे… विविध मागण्यांसाठी हजारो ग्रामस्थांचा मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको

शनिवारी (दि.5) रात्री साडेदहाच्या सुमारास चोपडे दाम्पत्याचा अपघात झाला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यास अटकही करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Road Roko Andolan on Mumbai Pune National Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नायगाव येथील चोपडे दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण मावळात संतापाची लाट उसळली. त्यात महामार्ग संबंधित विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला आणि प्रशासनाला लेखी निवेदन देवून आपल्या विविध मागण्या कळविल्या होत्या. अखेर शुक्रवारी (दि.11) हजारो ग्रामस्थांनी आक्रमक होत मुंबई – पुणे महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरला. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचे गांभीर्य दाखवून दिले.

शनिवारी (दि.5) रात्री साडेदहाच्या सुमारास चोपडे दाम्पत्याचा अपघात झाला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यास अटकही करण्यात आली आहे. परंतु, महामार्गावर सतत होणार अपघात आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कामशेत ते वडगाव दरम्यान सर्व्हिस रोड करणे सोबत इतर मागण्यांचे निवेदन एमएसआरडीसी अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासना यांना देण्यात आले.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या काय?
1. कान्हे ते कामशेत, कामशेत ते कान्हे फाटा सर्व्हिस रोड करणे.
2. नायगाव गावाजवळील महामार्गावरील तीव्र चढउताराचे क्रॉसिंग सपाट करणे.
3. नायगाव येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महामार्गावर उड्डाणपुल बांधणे. सध्या तात्पुरत्या लोखंडी पूल करणे.
4. रस्ता क्रॉसिंगवर स्पीड ब्रेक बसविणे.
5. नायगाव येथील पेट्रोल पंपाजवळील अनधिकृत दुभाजक बंद करणे.

सातत्याने होतायेत अपघात –
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे चक्र काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वी शिलाटणे फाटा येथे नवनाथ भुंडे आणि विद्या भुंडे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तर, चालू आठवड्यात नायगाव येथील गणेश चोपडे आणि अर्चना चोपडे दाम्पत्याचा अपघातात बळी गेला. काही दिवसांपूर्वीच पाथरगाव पुलाजवळ भरधाव चारचाकीचा धक्का लागून औंढे येथील स्वप्नील चव्हाण, त्यांची आई व एक मुलगा अपघातात जखमी झाले. यासह महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होतच आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा ते वाकसई फाटा दरम्यान अनेकदा अपघात होऊन अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. वारंवार होणारे अपघात पाहता, त्याची कारणे शोधणे, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभाग आणि प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पवना शिक्षण संकुलातील 88 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप । MLA Sunil Shelke Birthday

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
free bicycles distributed 88 students in Pavananagar

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पवना शिक्षण संकुलातील 88 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप । MLA Sunil Shelke Birthday

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.