व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News

नाणोली येथील ग्रामस्थांना वराळे व तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी गेले कित्येक वर्षे मारावा लागणारा सुमारे सात किलोमीटरचा वळसा आता वाचणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Inauguration of work of new bridge at Varale to Nanoli village Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नाणोली येथील ग्रामस्थांना वराळे व तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी गेले कित्येक वर्षे मारावा लागणारा सुमारे सात किलोमीटरचा वळसा आता वाचणार आहे. नाणोली व वराळे या गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) करण्यात आला.

नाणोली तर्फे चाकण या गावातील रहिवाशांना वराळे, तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी एमआयडीसी, आंबी मार्गे सुमारे सात किलोमीटरचा वळसा पडतो. ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी नाणोली व वराळे या दोन गावांना जोडणारा पूल आमदार शेळके यांनी मंजूर करून घेतला आहे. सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला तेव्हा ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.

आमदार शेळके म्हणाले की, वराळे-नाणोलीला जोडणारा पूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. आजही या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना लांबून वळसा घालून यावे लागते. अखेर हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात पुलासह जोड रस्त्याच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आणि आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न सुटणार असून दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.

पुलाचे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी अधिकारी व ठेकेदार यांनी काळजी घ्यावी. इतक्या वर्षानंतर होणारा पूल दर्जेदार व्हावा यासाठी ग्रामस्थांनी देखील कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे, अशी सूचना आमदार शेळके यांनी यावेळी केली.

कार्यक्रमास पोपटराव लोंढे, शांताराम काळे, रामचंद्र जगताप, संतोष लोंढे, विशाल शिंदे, सरपंच सौ.मोनिकाताई शिंदे, प्राजक्ता राजगुरू, शुभांगी लोंढे, दत्तात्रय मखामले, चंद्रकांत लोंढे, भगवंत मराठे, तानाजी मराठे, शंकरराव मराठे, निलेश लोंढे, महादू लोंढे, चंद्रकांत दाभाडे, सुनील भोंगाडे, बबन मराठे, कामशेत सरपंच रुपेश गायकवाड, रमेश मराठे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सूर्यकांत वाघमारे यांची आरपीआय पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती । Suryakant Waghmare
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी
– शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल


Previous Post

तळेगावमधील नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधणे कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न ; एकूण 3 कोटी 82 लक्ष निधी उपलब्ध

Next Post

विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval Vijayadashami Dussehra festival in traditional attire

विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.