Dainik Maval News : ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहरातील मोतीबाग राजवाड्याजवळील चौकास ‘सरसेनापती अजितसिंहराजे दाभाडे सरकार चौक’ असे नामकरण करण्यात आले. ‘सरसेनापती अजितसिंहराजेंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना सन्मान देणे म्हणजे त्यांच्या विचारांना आणि योगदानाला आदरांजली अर्पण करण्याचा एक प्रयत्न आहे.’ असे आमदार सुनील शेळके म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक माजी नगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे सरकार, रेणुकाराजे दाभाडे सरकार, उमाराजे दाभाडे सरकार, संध्याराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार उपस्थित होते. तसेच माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जेष्ठ नेते यादवेंद्र खळदे, गणेश भेगडे, गणेश खांडगे, कृष्णा कारके, रविंद्र दाभाडे, राजेंद्र पोळ, सुरेश साखवळकर, सुरेश धोत्रे, संतोष दाभाडे, इंदरशेठ ओसवाल, संतोषशेठ खांडगे, सुदर्शन खांडगे, सुरेश दाभाडे, विशाल दाभाडे, बाबुलाल नालबंद, ॲड. रंजना भोसले, चित्रा जगनाडे, शोभा भेगडे, ज्योती जाधव इतर मान्यवर, समस्त दाभाडे परिवार उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सूर्यकांत वाघमारे यांची आरपीआय पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती । Suryakant Waghmare
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी
– शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल
