Dainik Maval News : सात जिल्ह्यांतील रोटरी क्लब मार्फत विषमुक्त शेती बाबत राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे अध्यक्ष अभय देवरे यांच्या सहकार्यातून ब्राम्हणोली (ता. मावळ) येथील शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील दोन दिवसीय विषमुक्त शेती प्रशिक्षणात सहभागी होता आले.
ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे 7 व 8 ऑक्टोबर 2024 झालेल्या दोन दिवसीय विषमुक्त शेती प्रशिक्षणात सहभाग घेता आला. ब्राम्हणोली गावातून शेतकरी शंकर काळे, नवनाथ काळे, त्रषिकेश काळे तसेच रोटरी सहकारी संस्था शिव विद्या प्रतिष्ठान चे संतोष वंजारी व शिल्पा कशेळकर यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. पुढील काळात विषमुक्त शेतीबाबत जागृती व प्रयोग करण्याचा विश्वास सर्व सहभागी शेतकरी प्रशिक्षणार्थींनी दाखवला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार
– सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय