Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ तालुक्यात शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
पवन मावळातील ब्राम्हणोली गावात सोमवारी मतदार जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो; मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबादारी पार पाडा; चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या; आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान, अशाप्रकारे घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढत मतदान विषयी जनजागृती केली.
भेटकार्ड वाटप करून मतदान विषयी जनजागृती –
मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. गहुंजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता पोक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात पालकांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहनपर मतदानाची घोषवाक्ये असलेली भेटकार्ड तयारी केली होती. ही भेटकार्ड नागरिकांना वाटून त्यांच्यात मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.
देहूरोड येथे मतदान जनजागृती मोहीम –
मावळ विधानसभेत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार देहूरोड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरीक कट्टा, बँक, रिक्षा प्रवासी, भाजी मंडई आदी सार्वजनिक ठिकाणी शिक्षकांनी जाऊन ‘ताई माई मतदानाला चला’ या संकल्पनेतून मतदारांमध्ये जनजागृती केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News
– धक्कादायक ! जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक, पैसे परत न देता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी